मला ठार मारण्याची धमकी : अंबादास दानवेंचा आरोप

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्याला ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केला. त्यावर पोलिस संरक्षण कायम राहावे, म्हणून हा दानवे यांनी केलेला हा स्टंट आहे, असा पलटवार भाजपने केला आहे.
पत्रकार परिषदेत दानवे म्हणाले की, आपल्याला १२ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पाच ते सहा वेळा धमक्यांचे फोन आले. सुरुवातीला आपण त्याकडे दुर्लक्ष केले, पण एक फोन मध्यरात्री दोनच्या सुमारास आला. तो मी घेतला, तेव्हा समोरून बोलणार्‍या व्यक्तीची भाषा ऐकून मी हा प्रकार गांभीयनि घेतला.  या फोनवरील धमकी प्रकरणी शहरातील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ज्या मोबाइलवरून धमकीचे फोन आले, त्याआधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, ठार मारण्याचे धमकी प्रकरण घडल्याने आता पुन्हा दानवे यांच्या निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.